Nature Trip
विश्वभ्रमण GlobeTrotting

  August 27,2022

  

#सुवर्ष्ययात्राप्रवासWellRainyJourney2022 - भाग - 1
#विश्वभ्रमणGlobeTrotting*
#GlobeTrotting_to_Conserve_Inborn_LifeStyles 
आज पहाटे ब्राह्ममुहुर्तावर जाग आली.
मस्त झोप झाली होती. शरीराचे सगळे फुर्जे चेक केले... सगळे मस्त energize झाले होते. कुठेही दुखत नव्हतं तर जास्त उर्जीत वाटत होतं. प्रसन्न मन दोन दिवसांच्या आठवणीतून बाहेर येत नव्हतं. कारण होतं दोन दिवसांची सहल....
*मी आज तुम्हाला दोन दिवसांच्या सहल, Trip, Trail, Trek, Trotting, यात्राप्रवास, पर्यटन, सफर, Outdoor Living, Activities बद्दल सांगणार आहे....*
त्या आधी आपण ही सहल का काढतो? का जातो? याबद्दल समजून घेऊ....
आपलं शरीरमनात्मBodyMindSoul निसर्गाच्या भट्टीत तयार झालं. पोसलं गेलं. घडलं. ते घडवायला.. जन्माला घालायला.. बनवायला निसर्गाला अब्जावधी वर्षे लागली. पृथ्वीवर माणसापुर्वी अब्जावधी वर्षांपासून एकपेशी+बहुपेशी जीव जन्माला आले.  सुसूक्ष्म-सूक्ष्मजीव त्यांनतर वनस्पती त्यांनतर जंत जंतू कृमि कीड कीटक पशु पक्षी. ही भूमी जैवविविधतेने नटली. निसर्गाने सर्वतःला अत्यंत परिपूर्ण बनविले. सगळीकडे समता बंधुता स्वातंत्र्याने जगणारे 84 लक्ष जीव होते. मानव जन्माला येण्यापुर्वी इथे निसर्ग अतिउच्च अवस्थेला पोहोचला होता. तो या भूतलावर येण्याने फार काही फरक पडणार नव्हता. मात्र तो येण्याने भयंकर नुकसान मात्र झाले यात काय शंका आहे?
माकडांच्या वंशावळीतून फिल्टर होत होत मनुष्याच्या सात जमाती पैकी एक प्रजाति टिकली ती म्हणजे आजचा माणूस... अत्याधुनिक माणूस.... म्हणजे मीच हो.
तो कधीतरी गुहेत राहत होता.... तर वनवासी आदिवासी सुद्धा होता. त्यानंतर शेती करणारा शेतकरी आणि आता नोकरी, चाकरी, रोजंदारी, धंदा, व्यापार, व्यवसाय करणारा... देव-आसुर-सैतान-धर्म-जातपात-समाज-अर्थ-राजकारण करणारा माणूस. सर्वात शेवटी जन्माला येणारा आणि कमी evolution इतिहास असणारा फक्त २०० हजार वर्षे वयाचा मनुष्य प्राणी म्हणजे HomoSapiens. त्याहीपेक्षा कमी इतिहास म्हणजे शिकलेला माणूस २०० ते ३०० वर्षातला आणि अत्याधुनिक मानव या तीसेक  वर्षातला. 
हजारो वर्षापासून लागलेल्या सवयी सोडून माणूस अचानक स्वतः तयार केलेल्या जग जगायला लागला.
सर्वांच्या सारखे त्याचेही शरीर हे पेशी-उती-धातू-अवयव-हाडामांसाचे बनलेले. निसर्गाने जन्माला घातलेले, उत्पत्ती केलेले, बनविलेले हे शरीरमनात्मBodyMindSoul निसर्गच पोसणार. त्यासाठी त्याने त्या पोषणाची सोय सुद्धा निसर्गातच केलेली आहे. त्यामुळे त्याला सुद्धा निसर्गात चांगले वाटणार. 
आपल्या तोंडाने जेवढे अन्न - पाणी - हवा घेतले जाते त्या पेक्षा जास्त अन्न सूर्य प्रकाशातून, पाणी आद्रतेतून आणि श्वास हवेतून त्वचेमार्गे घेतला जातो. तेही घामाच्या बदल्यात. फक्त अन्न-पाणी खाऊन आपले पोषण अत्य अल्प होते तर शरीराला पचन करण्यास अत्यंत वेळ द्यावा लागतो. त्यातून जास्त साठणारी न साफ होणारी घाम - संडास - लघवी आणि साठणारे आजारच तयार होतात. हे हजारो पिढ्याना माहिती होते. त्यासाठी त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ अशा वातातपिकरसायनWindSunRejuvenation ला मान्य केले. निसर्गतः मानव उन्हं - वारा - पावसात राहायचा. ऋुतूमानानुसार उगविलेलं अन्नपाणी खायचा. एकतर उत्तोत्तम निरोगी राहून उत्तम आयुष्य स्वीकारायचा नाहीतर नैसर्गिक किंवा आपत्ती जन्य मृत्यूला लगेच स्विकार करायचा. गरजा जेमतेम जिथे जन्माला आलो तिथेच पूर्ण व्हायच्या आणि तो करायचा सुद्धा. लोकसंख्या अत्यंत नियंत्रित. अत्यंत अनुकूल आणि प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा त्याची परीक्षा नेहमी निसर्ग घ्यायचा. जो त्यामध्ये रोज पास तो १०० वर्षे जगायचा. ३६५०० दिवसांची ही जीवनाची परीक्षा रोज पास करणारा आणि निसर्गाला समजून उमजून जगणारा मानव या भूतलावरील सर्वश्रेष्ठ प्रजाति जिने निसर्गसंवर्धनासोबतच स्वतःला सातत्याने संवर्धित करून आम्हां अत्याधुनिक मानवाला जन्माला घातले. 
आम्ही अत्याधुनिक मानवाने हा उन्हं - वारा - पाऊस नाकारला. अत्यंत कोंडली जाणारी आणि सुविधांचा महापूर असणारी निसर्गापासून तोडणारी घरे आणि शहरे बांधली. साहजिकच आपल्या शरीरमनात्मBodyMindSoul चा निसर्गाशी संबंध तुटला. ऋतुमानानुसार अन्नपाणी - विहार काम-धंदा-व्यापार-कौशल्य-कला-क्रीडा-जीवनशैली बंद झाली तसे आजार आणि औषधांचे आणि नको त्या अन्नपाण्याचे पिक वाढू लागले. नैसर्गिक मृत्यु संपुष्टात आला. आज धड बालपण व्यवस्थित नाही तर तारुण्य तरुणपणाच्या लायकीचे नाही तर अत्यंत पूर्ण वृद्धिंगत होणारे mature म्हातारपण-आप्तपण दुरापास्त झाले आहे. माणूस कोणत्याही अवस्थेत नाही तर आजारी अवस्थेत, जगण्याच्या शर्यतीत जगत आहे. उन्हं वारा पावसात ताकद वाढवणारा माणूस आता उन्हाने काळा पडू लागला तर पावसाने ताप-सर्दी-खोकला-सांधे-दुखीने बेजार झाला तर थंडीत कोरडा पडू लागला. मग तो अजूनच स्वतःला कोंडून घेऊ लागला. उन्हं वारा पावसातून मिळणारे अन्नपाणीहवा बंद झाले. फर्टीलायझर - पेस्टीसाईड - प्रिझरव्हेटीव - मीठ- तेल - तिखट- मसाले चवीचे अन्न खाणारा माणूस त्यासोबत फिल्टर बॉटल वॉटर पिऊ लागला. चार भिंतीत AC मध्ये काम करू लागला. मग प्रत्येक पेशी-उती-धातु-अवयवांच्या आजारांचा त्यावरील औषधांचा आणि त्यावरील अनेक उपचार पद्धतींच्या तज्ञांच्या हातातील बाहुले झाला. अगदी पित्त ते कॅन्सर कोणालाही होऊ लागले. AC हॉस्पिटल आणि  मेडीकल मध्ये केमिकल्स औषधांच्या गराड्यात सातत्याने काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील अति बिझी लोकांचे काय होत असेल त्यांचे त्यांनाच ठाऊक  त्यामुळे अगदी उपचार करणारे तज्ञ सुद्धा मग अजूनच औषधे खाऊ लागले आहेत. आज माणूस अन्नपाण्यापेक्षा औषधे जास्त खातो. आजारी असो नसो. त्याच्या अन्नपाण्यातून अनेक केमिकल्स रोज पोटात जातात. ते आतच साठतात कारण तो उन्हं - वारा - पावसात जात नाही. 
मग आठवडा भर भयानक कोंडलेली ही माणसे जनावरे बनतात. त्यांचे मन निसर्गाकडे धावू लागते आणि शनिवार रविवारी ही लोकं शहरापासून दुर पळू लागतात. पण दुर्दैव असे की तिथेही जाऊन ते परत मस्त स्टार रेटेड AC रूम शोधतात. AC कार, टोपी, छत्री, रेनकोट, गॉगल्स, जर्किन, स्वेटर, हातमोजे अशा accessories ने खच्चून भरून निसर्गाला दूरच ठेवतात. तिथले लोकल अन्नपाणी खातपित नाहीत. याउलट अजुनच बेशिस्त बेसुरपणे अन्नपाणी दारु शारू हाणतात आणि हँग ओव्हर घेऊन थकुन परत शहरातील शर्यतीत जुंपले जातात.
वरील विचार फार वर्षांपासून केला गेला आणि ऋतुमानानुसार जीवनशैली तयार झाली. माणूस रोजच स्वतःच्या शेता रानात सहल trip पर्यटन करायचा. त्यामुळे त्याला बाहेर जावे लागायचे नाही. 
आता सहल trip पर्यटन ही जीवनशैली राहिली नाही तर ते एक काहीसाठी पार्टीप्लेस तर काहींसाठी व्यसन तर काहीं साठी धंदा बनला आहे. 
आम्ही जरा जुना विचार परत परत केला आणि मध्यम मार्ग स्वीकारण्याचे ठरविले....
आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वश्रेष्ठ अशा *वातातपिकरसायनWindSunRejuvenation* चा मध्यम मार्ग....
आता वाचा दोन दिवसांच्या सहली विषयी....
*मी हे सर्वांसाठी लिहीत नाही...*
*जे काही दोनचार जण ज्यांना असं जगायचे आहे त्यांच्यासाठी लिहितो...*
 *सुवर्ष्ययात्राप्रवासWellRainyJourney2022*
आम्ही
अंतर्गत,
*25 & 26 गुरुवार शुक्रवार ऑगस्ट 2022*
रोजी,
*कैलासगड ट्रेक आणि आंधरबन ट्रेल सहल* काढली. 
पोहोचण्यासाठी फक्त वाहन वापरले. त्यांनतर सातत्याने आमच्यासोबत डोंगर, दऱ्या, शेते, राने, ओढे, नाले, धबधबे, पाऊस, उन्हवारा, बोचरी थंडीत स्वतःला झोकून दिले.
गुरुवारी सकाळी सकाळी मुळशी धरणाजवळ आम्ही रिव्हर प्लेसला पोटभर न्याहारी घेतली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. 
त्यांनतर भरपुर चालणे, चढणे. भिजवायला पाऊस तर परत वाळवायला उन्हवारा यायचा. पहिल्या दिवशी सहा तास चढणी - उतरणीचा ट्रेक आणि दुसऱ्या दिवशी ओढे, नाले, धबधबे, पाऊस, उन्हवारा यामधून ट्रेल जवळपास बारा-पंधरा किलोमीटरचा.. 
रोज सकाळी पोटभर न्याहरी जेवण आणि सायंकाळी सुर्यास्त पूर्वी ट्रेक ट्रेल पूर्ण झाल्यावरच पोटभर जेवण. त्यामुळे कुणाला साधी शिंक नाही की पोटाचा त्रास नाही. जेवणात मस्त रानभाज्या, लापशी, कढी, वडी, भाकरी, चपातीचे शुद्ध शाकाहारी जेवण. 
दोन दिवसांत आम्ही गावरान तांदळाचाभात, खीर, खिचडी, मसाले भात, नाचणी, तांदूळ भाकरी, चपाती, भारंगीची भाजी, ताकाची कढी, गव्हाची लापशी, पिठलं, तिथली लोकल वांगे-बटाटा-हरभरा शेकभाजी, पातळ मोड मटकी, आळूचे फदफदे, आळुवडी, ठेचा खरडा, लोकल लोणचे, कोशिंबीर, दही, मेथी-आलू पराठे असे शुद्ध शाकाहारी भोजन शांतपणे तेथीलच पाण्यासोबत सेवन केले. 
याव्यतिरिक्त वेळेत,
परिसर फेरी, चहापान, गप्पा, चर्चा, फुलपाखरे, सर्प, वनस्पती, आयुर्वेद, जैवविविधता यावर चर्चा. 
दंगा-मस्ती, खोड्या, मनोरंजन, पाऊस-ढगाळ-चांदण्या रात्री गप्पा.
कोणाकडे लॅपटॉप होता ना कुणाचे मोबाईल वाजले ना कोणी ग्रुप सोडुन बाकी काय करत होता. आसपास मनुष्य वस्ती अत्यंत तुरळक. रूम मध्ये फक्त झोपायला. डास नव्हते ना AC होता. पुढच्या मागच्या खिडक्या उघडल्या की धबधबे डोंगर दऱ्या. छतावर धाडधाड पडणाऱ्या पावसाचा आवाज.
🌹🌹🌹🌹🌹🌹
वात-आतप–वर्षज स्नान-रसायन; वनस्पती, जैवविविधता दर्शन; पर्वत-जल-वन-साहसविहार; नयनरम्य धबधबे, ओढे झरे, वर्षावनानुभूती. थकवा येऊनही आल्हाददायक यात्राप्रवास. पूर्णतः भिजूनही शरीरात उर्जेचा संचार. गाढ झोप. 
सहलीचे वैशिष्ट = 
दक्षिणायन, वर्षा-शरदऋतु पूर्णिमांत भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशी-चतुर्दशी विक्रमसंवत 2079 / शकसंवत 1944 अमांत श्रावणातील पुष्य / आश्लेषा नक्षत्रामधील वैदिक नभः-नभस्य अंत आणि इष-उर्जऋतु प्रारंभ. रुक्ष गुणातून स्निग्ध-स्निग्धतर आणि अम्ल-लवणरसाकडून मधुर रसाकडे पित्त-वाताच्या प्रभावाखाली अल्पबला कडून मध्यमबलाकडे प्रवास म्हणजे हा आजचा गुरुपुष्यामृतयोग असणारा सुवर्ष्यWellRainy म्हणजेच स्थिर झालेला पावसाळा. पुढील ऋतूमध्ये येणारी ऊर्जा ग्रहण करण्यासाठीचा प्रारंभ. मधे-मधे येणाऱ्या पावसाच्या तुषारात कोष्ण वाऱ्यात डोकावून बघणाऱ्या सूर्याच्या मस्त उन्हात हा प्रवास आम्ही केला. वर्षा वनांत भिजलो. स्थिर कोसळणाऱ्या धबधब्यात, संथ वाहणाऱ्या ओढ्यात डुंबलो. संपूर्ण त्वचेच्या रंध्रातून या ऋतु मधील प्राणवायु शोषून प्रकुपित पित्त-वात दोषांना वाट मोकळी करवून देऊन प्रशम केले. साहजीकच वर्षाऋतुमधील अपेक्षित पंचकर्म झाले.
तिथे आम्हांला अनेक दिव्य वनोषधी दर्शन झाले. तिरफळ, खोकली, रानमरीच, आलू, तमालपत्र, करमळ, कोकम, कडीपत्ता,  रानकदली (कंद जल तेथील लोक सर्पदंश साठी वापरतात.) , राजपाठा इत्यादी अनेक वनस्पती तर घोटवेल सोबत भारंगीच्या कोवळ्या पानाची एकत्र भाजी याबद्दल माहिती. इखारीचीसाल, वाघाटी, टनटनीचा – गर्भरक्त स्त्रावशी संबंध. Ceropegia, Asteraceae, Delinia, कारवी च्या अनेक व्हरायटी, फुललेली Curcuma रान हळद, फ्लक्ष, शेवाळे, फुले, असाना इत्यादी अनेक द्रव्ये पाहायला मिळाली. कोंबलची फळे शेखरू खाली पाडतात अन त्याला भेकर, पिसारे कसे फस्त करतात. फुरसे, अजगर, हरिणटोळ, घोणस, घोरपड, भेकर, बिबटे, ससे, रानडुकरे यांचा वास इथे कसा आहे? आपण इथे औषधी गोळा करायला किंवा तोडायला जात नाही आहोत. आपण त्यांचा अभ्यास करून तेथील लोकांना त्यांचे जतन कसे करायचे ते सांगितले. तेथील शेतकऱ्यांची शेती जंगलाच्या आजूबाजूला आहे. तिथे या वनस्पतीचे संवर्धन-उत्पादन कसे करायचे हे सांगितले. तेथील लोकल अन्नधान्य-रानभाज्या अजून कश्या वाढवता येतील याबद्दल बोललो. आपण सर्वजण मिळून आपल्या मुलांना ते कसे मिळेल? याची तरतूद करण्यासाठी तिथे आम्ही गेलो होतो. जंगले वाचण्यासाठी तिथे नुसते फिरायला जाणे गरजेचे नाही तर सर्वजण मिळून तिथे संवर्धन हालचाली करणे गरजेचे आहे.   
संपूर्ण रसायनRejuvenation... 
Away from Electricity...
Away from Saturday & Sunday Rush.....
Aloneness with Like Minded person.... 
🌕🌕🌕🌕🌕🌝
Miracle experience... Continuous Adventure...
🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
*Rules* 
*No Smoking 🚭*
*No Alcohol 🍻*
*No Non-Veg 🍖*
*No Packed Bottled water*
*Absolutely No Plastic Paper Waste*
*No Lonlyness Irritations Sensitivity Suffocation Frustration*
*Joint Family Tour.*
*विशेष आभार ="
आम्ही ४३ जण होतो त्या सर्वांचे आभार. 
यामध्ये पाच सहा ते सोळा वर्षातील अन्वय, राज, विश्व, स्वरूप, देवांश या बालचमुंचे विशेष कौतुक न थकता यांनी सर्वकाही करुनही ते खेळत राहिले. त्यामुळे आम्हीही लहान झालो होतो.
सुमेध, मैत्रेय, गार्गी, रौनक, आदित्य हे teen एजर्स इथे चांगले खुलले यांनी फोटोग्राफी केली. सगळ्यात सहभाग दिला. शेवटी दिलखुलास बोलू लागले. 
आयुर्वेदाचे भावी वैद्य आर्या, माधव, सार्थक, वल्लरी, कृष्णा, अक्षय, गणेश, विजयालक्ष्मी, धनंजय यांनी वनस्पति दर्शन, शास्त्र सोबतच जैवविविधता अभ्यासाची मजा घेतली. फोटोग्राफी केली. या तरुणांनी धमाल आणली. आर्या ही सह्याद्री मधील चांगली ट्रेकर आहे तिने आम्हाला सुखरूप आणले. 
ऍग्रो टुरिझम व्यवसाय करणारे माऊली कृषि पर्यटनाचे नवदाम्पत्य वैभव - मोनिका आमच्यात समरस झाले होते. 
सर्वात सिनियर माधुरी तसेच त्यांच्या पाठोपाठ अपर्णा, शालिनी, वैशाली यांनी आमचा उत्साह वाढवत सहल पूर्ण केली. 
आमच्या सहलीचे आयुर्वेदा वैद्य जोड्या-कपल सेलिब्रिटी होते. हरीश - स्नेहल पाटणकर, निलेश - सारिका लोंढे, विवेकानंद - रोहिणी पाटील, अरविंद - प्रिया कडुस...
यांनी आम्ही अजूनही अत्यंत तरुण असून हे दाखवून दिले. पोस्ट वेडींग फोटोग्राफी एन्जॉय केली. अत्यंत अभ्यासपूर्ण आयुर्वेद वनस्पती जैवविधता याबद्दल ज्ञान दिले. आयुर्वेद चर्चा झाली. 
विशेष म्हणजे आदरणीय वैद्य. अरविंद कडुस यांनी प्रत्येक वनस्पतीची ओळख करून देताना त्या वनस्पतीच्या प्रत्येक अंगाचा निसर्गातील सहभाग आणि मानवी जीवनास उपयोग सांगितला... अगदी त्यासोबतच आदरणीय फुलपाखरू-पक्षीतज्ञ दिवाकर ठोंबरे यांनी अनेक फुलपाखरू पक्षांचे निसर्गातील योगदान, कार्य, त्यांचा वनस्पति संबंध सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले. या कार्यात त्यांच्या सौ शिल्पा या किती समरस आहेत याची प्रचिती आली. सरांनी रात्री याबद्दल अत्यंत मनोरंजक माहितीपूर्ण चर्चा घडवून आणली. सर्व वयोगटातील सर्वचजण हे सर्व अगदी तन्मयतेने ऐकायचे. 
पक्षी आणि फुलपाखरे जैव विविधतेचा अविभाज्य भाग कसा आहेत हे त्यांनी अत्यंत मनोरंजक भाषेत सांगितले.
वैद्य अवंतीने तिच्या गाडीत सर्व महिलांना आणले होते आणि स्वतः ड्राईव्ह केले. तिचा अन्वय सर्वात लहान आणि आई सर्वात सिनियर या दोन्ही आघाड्यांवर अवंती शंभर मार्कांनी पास झाली.
वैद्य प्रवीण यांचे स्थितप्रज्ञत्व सर्वांना उर्जा देत होते. 
वैद्य. मंजुळा यांनाही आयुर्वेदामृत सर्वांना वाटले...
अत्यंत खेळकर स्वभाव असलेले आमच्या सर्वांच्या क्लिनिकचे लाडके इंटेरियर डिझाईनर आदरणीय प्रसाद गायकवाड सर यांनी सर्वांचे फोटो अनेक डिझाईन मध्ये काढून त्यांचे अंतरंग फुलविले. सरांच्या फोटो ग्राफिने या सहलीवर मुकुट चढविला गेला. 
पुढच्या आठ दिवस तरी किमान या सहलीचे फोटो पाहायला विसरू नका....
#सुवर्ष्ययात्राप्रवासWellRainyJourney2022 - भाग - मध्ये...
आम्हाला गडकोठावर घेऊन जाणाऱ्या आणि खेकडे, भेकर् यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या वडुस्ते गावच्या तिसरीच्या सायलीचे आणि नववीच्या वैभव या बहीण भावाचे त्यांच्या आईवडील आजीचे विशेष कौतुक....
आंधरबन पिंपरीतील चैतन्यतेजच्या ताई, त्यांचे यजमान, सासूबाई आणि परीचारकांचे अत्यंत रुचकर आणि गावरान रानभाज्या दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 
स्वराज आंधरबन कृषि पर्यटन चे विशाल त्यांच्या सौ आणि आईवडील यांनी निवास भोजन व्यवस्था एकदम व्यवस्थित केली होती त्यामुळे ही सहल अत्यंत कौटोंबिक झाली त्याबद्दल त्यांचे आभार.
खासकरुन विशाल आणि त्यांच्या सासऱ्यांनी लोकल बीज, अन्न, वनस्पती, पशू पक्षी, जीवनशैली, अधिवास यांची माहिती देवून आमची मने जिंकली.
आमच्या सहलीच्या सुरुवातीला रिव्हर प्लेस यांनी पोटभर न्याहरी खाऊ घातली त्यामुळे पुढे किल्ला पार झाला.
प्रिया मॅडम यांनी रचलेले आणि दिवाकर आणि समूह यांनी गायलेले,
मुरी वेण्णा तेल 
ओ आय हाय मुरी वेण्णा तेल 
थोडी सी सुजन थोडासा *पेन*
ओ आय हाय *मुरी वेण्णा* तेल 
🙌🏻🙏🏻
यांने धमाल आणली. अनेक घोषणांनी जान आणली.
अजून खूप लिहिण्यासारखे आहे.....
असे हे कुटुंब सहलीला गेले होते. कुणीही प्रायव्हेट स्पेस मध्ये लपत नव्हते....
आमचे कॉलेज मित्र अजय इचलकरंजी वरून सहलीला आले होते. त्यांना चक्कर येण्याचा त्रास असताना सुध्दा आमची साथ सोडली नाही. विश्रांती घेत घेत सहल पूर्ण केली.
निघाल्या पासुन शेवटपर्यंत सर्वांनी साहचर्य, सहकार्यातून सहजीवन जगताना एकत्रित कुटुंबाची अनुभूती घेतली त्यामुळे मला, डॉ. मनिषा आणि डॉ. वैशालीला असे संयोजक म्हणुन वेगळे काम राहीले नाही. 
पडद्याआड तनिश, ऐश्वर्या, अपूर्वा, वैद्य. प्रदीप सर, वैद्य. संदीप सर आणि स्वग्राम टीमने खुप पाठबळ दिले.
मी फक्त एक निमित्त होतो.
जानेवारीत असेच आयुर्वेद योग - निसर्ग - कृषि - पर्यटन -  जीवनशैली - जैवविविधततेचे चार दिवसीय निवासी गुरुकुल संमेलन घेण्याचे ठरवुन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
🙏🏻
#विश्वभ्रमणGlobeTrotting*
#GlobeTrotting_to_Conserve_Inborn_LifeStyles 
#स्वग्रामCommunitySelfDependenceVillage* #ज्ञानयोगआयुKnowledgeOfLifeSustainableUniverse*
#वैश्विक_कृषि_वनोषधि_पंचगव्य_स्वास्थ्य_स्वग्राम_संस्कृति 
#आयुर्वेद_योग_निसर्ग_कृषि_पर्यटन 
#vd_santosh_suryawanshi