Blog 
#कायायुर्वेद

#कायायुर्वेद

#कायायुर्वेद
हिवाळा आला की पानाला लावलेलं व्हॅसलीन क्रीम आणि सुकलेल्या सफरचंदाची जाहिरात हमखास बघायला मिळते.
खरंतर थंडी सुरु होतानाच आपल्याकडे दिवाळी चं अभ्यंग स्नान सुरु होतं, पुढे हिवाळा संपेपर्यंत रोज सकाळी  अंगाला तेल लावून उटण्याने अंघोळ केल्यास त्वचा रुक्ष/Dry होत नाही. कारण तेल स्निग्ध/Oily असतं.
नेमकं हेच आपण विसरतो आणि अनेक क्रीम त्वचेला फासत बसतो, ज्या त्वचेत absorb म्हणजे शोषल्या जात नाहीत, उलट त्याचा एक थर त्वचेवर तयार होतो आणि हाच थर त्वचेला नैसर्गिक पोषणापासून व अन्य गरजेच्या गोष्टींच्या शोषणापासून परावृत्त करतो. यामुळे त्वचेला अजून रुक्षपणा येतो. 
थंडीत रुक्षतेमुळे हाता पायांना चिरा पडणे, भेगा पडणे, खाज सुटणे,  त्वचेला खाज सुटणे, कोंडा अधिक होणे, ओठ उलणे, चेहरा ओढल्याप्रमाणे वाटणे, सुरकुत्या पडणे इत्यादी गोष्टी सुरु होतात.
हे टाळण्यासाठी च या काळात अधिकाधिक स्निग्धतेची आहारात पोटातून व बाहेर स्नेहनातूनही घेण्याची गरज असते.
म्हणून तर दिवाळीत तळलेले तेलकट- तुपकट पदार्थ जास्त येतात.
अंगाला पण तेल लावण्याची, उटणं लावण्याची पद्धत रुजू झाली.
अगदी पूर्वी ओठ फुटले की आज्जी दुधावरची साई, तूप रोज ओठांना लावायची, पायांच्या भेगात मेन पातळ करून लावायची, चेहऱ्याला दुधाचा फेस, क्रीम किंवा साई लावली जायची, मस्त तेलाने अभ्यंग करून , उटणं लावून गरम पाण्याने अंघोळ घातली जायची, हे नैसर्गिक उपचार सोडून आपण आता कृत्रिमरीत्या ते करायला बघतोय आणि अजून आजार वाढवून घेतोय.
लक्षात ठेवा-
त्वचा पण श्वास घेते, अनेक गोष्टी उत्सर्जित करते, अनेक गोष्टींचे पचन करते. शरीरातील उष्ण व थंड गुणांचे संतुलन करते. त्यामुळे तिच्यावर कोणताही अनैसर्गिक लेअर लावून तिच्या कामात अडथळा आणून अनेक आजारांना निमंत्रण देऊ नका.
#कायायुर्वेद
#kayayurved
#वैद्यपाटणकरहरिश

You may also like