Blog 
Healthy Body is Covered with Healthy Skin.

Healthy Body is Covered with Healthy Skin.

#कायायुर्वेद
आजचा विचार-
निरोगी शरीर हेच निरोगी त्वचेने झाकले जाते.
Healthy Body is Covered with Healthy Skin.
Dr S Gopakumar
खरंतर वर वर पाहता हा विचार फार मोठा वाटत नाही.
पण त्वचारोग झालेल्यांनी थोडा बुद्धीला ताण देऊन हा विचार वाचला तर या विचारांची खोली लगेच कळते.
त्वचा निरोगी असण्यासाठी आदी शरीर निरोगी असावं लागतं.
जे जे त्वचेवर दिसत आहे ते ते आत झालेल्या शरीरातील कोणत्या ना कोणत्या बिघाडाचे द्योतक आहे.
म्हणून वरून बाह्य उपचार त्वचारोगात न करता आभ्यान्तर म्हणजे पोटातून औषधे दिली की ती लगेच व कायमस्वरूपी गुणकारी ठरतात.
जसं जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे, अगदी त्याचप्रमाणे आपली निरोगी त्वचा हे निरोगी शरीराचे लक्षण आहे.
त्वचारोग उलट खूप सुंदर काम करतात, तुमच्या शरीरात भविष्यात निर्माण होणाऱ्या मोठ्या आजारांचे लक्षण स्वरुप येतात.
ते तुम्हाला जाग करत असतात.
साधं ताण तणाव stress वाढल्यानंतर वाढलेली त्वचेची खाज सुद्धा आपल्याला ताण तणाव नियंत्रित करायचा सल्ला - अलार्म आहे. लगेच त्यावर नियंत्रण आणलं तर पुढील धोका टळणार आहे.
पण आपण नेमकं उलट करतो, ताण कमी करण्याऐवजी त्वचेवर काहीतरी स्टिरॉइड चे मलम लावून तिचं खाजन मेंदूला कळायचं तेवढं बंद करतो.
आजार आत वाढतच चाललेला असतो.
तोच भविष्यात मग वेगळं रूप धारण करून येतो.
म्हणून तर लक्षात ठेवा-
Healthy Body is Covered with Healthy Skin.
#kayayurved
#Dr_Harish_Patankar
#वैद्यपाटणकरहरिश

You may also like