Blog 
We Treat Inside Out

We Treat Inside Out

जवळपास 36 पेक्षा जास्त व सलग कॉस्मेटोलॉजि व ट्रायकॉलॉगी क्षेत्रातील कोर्स यशस्वीपणे चालवून अनेक सौंदर्य चिकित्सक या क्षेत्रात घडवले. आता त्वचारोग क्षेत्रात (डरमॅटोलॉजि मध्ये) #कायायुर्वेद च्या माध्यमातून अनेक सुपर कन्सल्टंट घडविण्याचा आमचा मानस आहे .
आदरणीय गोपकुमार सरांनी काल पहिल्याच व्याख्यानात
त्वचारोगांच्या चिकित्सेचं गमक उलगडले.
त्वचारोग हे बहुतांशी वेळा आतून बाहेर आलेले असतात.
त्वचा बाहेरची असल्याने आपण त्वचारोगांना बाहेरचे समजतो व वेगवेगळे मलम, क्रिम, तेल , लोशन लावतो.
तात्पुरते बरे वाटते पण आजार पुन्हा सुरु होतो.
आयुर्वेदात "क्षीरस्येव संतानिका।। अर्थात ज्या प्रमाणे दुधावर साई येते त्याप्रमाणे त्वचेची निर्मिती शरीरात होते असे सांगितले आहे.
त्यामुळे खऱ्या अर्थाने त्वचारोग कायमस्वरूपी बरे करायचे असतील
तर काम हे आतून बाहेर केले गेले पाहिजे, नाही की बाहेरून आत.
म्हणूनतर आयुर्वेद आजाराला मुळापासून बरे करतो असे म्हणतात.
ती त्वचारोगाची मुळं नेमकी आत खोलवर रुजलेली असतात...
म्हणून आम्ही त्वचारोग चिकित्सा करतोय...
आतून बाहेर..!!
सोरिऍसिस, एक्सिमा, गजकर्ण, खरुज, कोड अश्या अनेक आजारांसाठी, अनेक वर्ष्याच्या अनुभवातून व अचूक निदान आणि सर्वसमावेशक चिकित्सा पद्धतीतून , आयुर्वेद ग्रंथोक्त ज्ञान व आधुनिक मशिन च्या साहाय्याने आम्ही लवकरच घेऊन येत आहोत एक वेगळीच व परिपूर्ण चिकित्सा पद्धती व सॉफ्टवेअर.

Kayayurved ..
We Treat...
Inside Out...!!

#kayayurved
#कायायुर्वेद

You may also like